बुधवार, १ जुलै, २०२६
शुक्रवार, १९ जून, २०२६
निसर्ग आपल्या आवती भवती.......पैसा किडा / वाणी किडा
पैसा किडा एक ते दोन वर्ष जगतो. मादी सुमारे 150 ते 200 अंडी घालते. अंड्यातून बाहेर पडल्यानंतर सर्व पिल्ले एकत्रित प्रवासाला निघतात. एकत्रित जण्याने शत्रूला एवढा मोठ्ठा कसला प्राणी म्हणून सहज चकवा देता येतो. त्यामुळे त्यांना काठीने विसकटले तरी ते पुन्हा पुन्हा एकत्रित येतात. 20 ते 21 दिवस एकत्रित राहिल्यानंतर हे सर्व किडे आपआपल्या मार्गाने इतरत्र पसरतात. कुजलेला पाला-पाचोळा व बारीक बारीक वनस्पतीची लव हे त्यांचे अन्न. हे निरुपद्रवी असल्याने सहसा कोणी त्यांना मारत नाही.
गुरुवार, १९ मार्च, २०२६
भिंतीबाहेरची शाळा....
भिंतीबाहेरची शाळा....
वृक्षतोड व जंगलाची मोठ्या प्रमाणात घट होत असल्याने प्राणी- पक्षांचे अधिवास कमी होत आहेत. याचा एकूणच त्यांच्या जीवनावर परिणाम होऊन त्यांची संख्या झपाट्याने कमी होताना दिसून येते. म्हणून आम्ही दरवर्षी पक्षासाठी घरटी तयार करणे, अन्न व पाण्याची सोय करणे. मोकळ्या जागेत बिया पुरणे, आणि त्या परिसराची स्वच्छता हे उपक्रम गेल्या तीन वर्षापासून राबवित आहोत.
प्रामुख्याने शाळा बालसुधारगृह (मलकापुर) व आगाशिव डोंगर (जखिणवाडी) परिसर हे आमचे कार्यक्षेत्र. प्लॅस्टिकच्या बाटल्यांपासून पाणी साठवण्यासाठी व अन्न साठवण्यासाठीची भांडी तयार केली जातात. नारळाच्या कवट्या, पोकळ बांबूचे अर्धे तुकडे, प्लास्टिकचे कॅन यांचा उपयोग केला जातो. गेल्या वर्षी तब्बल 9 पोती प्लॅस्टिक आगाशिव डोंगराच्या पायथ्यापासून गोळा झाले होते. वर्षभरातील मुलांनी खाल्लेल्या फळातील बियांचे झालेले संकलन मोकळ्या माळा पर्यंत येवून पोहचते. आणि एक एक बी मातीचा आसरा घेते. तेव्हाच मुलांची मातीशी असणारी नाळ जोडली जाते. आणि शिक्षण म्हणजे तरी दुसरे तिसरे काय...?
(प्रदीप रवलेकर, कराड)
शुक्रवार, १५ ऑगस्ट, २०२५
प्रवास वर्णन
नाणेघाट....प्राचीन व्यापारी मार्ग...
मंगळवार, २० मे, २०२५
निसर्ग आपल्या आवती भोवती- काजवे
काजव्यांच्या दुनियेत......
गुरुवार, १५ मे, २०२५
निसर्ग आपल्या आवती-भोवती
घोस्ट ट्री/ भुतियाचे झाड
रविवार, २१ जुलै, २०२४
प्रवास वर्णन
सांधण व्हॅली- निसर्गाचा अदभूत चमत्कार
मुलांच्यासाठी अभ्यास, मस्ती, खेळ व भरपूर वाचनाचा खजिना उपलब्ध मुलांसाठी फ्री वाचन साहित्य उपलब्ध लिंक वर क्लिक करा आणि पुस्तक वाचनाचा आ...
-
प्रवास वर्णन नाणेघाट....प्राचीन व्यापारी मार्ग... महाराष्ट्रातील एक प्राचीन पुरातत्त्वीय अवशेषांचे स्थळ म्हणून ओळख असणाऱ्या नाण...
-
निसर्ग आपल्या आवती-भोवती पावसाचे गाव.....पाथरपुंज भारतातील सर्वात जास्त पर्जन्यमान असलेले ठिकाण म्हणून चेरापुंजी ओळखले जाते. अभ्यासा...
-
निसर्ग आपल्या आवती भोवती- काजवे काजव्यांच्या दुनियेत...... चार-दोन आम्रसरीचे पाऊस झाल्यानंतर हवेमधील उष्णतेची जागा गारवारा घे...





















